Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

अन्यायाची चिरफाड करून वैज्ञानिक विचारांची पेरणी अण्णाभाऊंनी साहित्यातून केली : भंते धम्मदीप

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 

अन्यायाची चिरफाड करून वैज्ञानिक विचारांची पेरणी अण्णाभाऊंनी साहित्यातून केली : भंते धम्मदीप


सांगली (प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती येथील रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पूज्य भंते धम्मदीप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
 
       या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना भंते धम्मदीप म्हणाले, "अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक धगधगता निखारा होता. शेतकरी, शेतमजूर, महिला, दीन-दलित आणि कष्टकरी कामगारांवर शेकडो वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाची चिरफाड अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून केली. त्यांनी वैज्ञानिक विचारसरणी अंगीकारून समाजाचा उद्धार करण्याचा मार्ग आपल्या साहित्यातून स्पष्टपणे दाखवून दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय असून, त्यांच्या साहित्याचा अनेक भारतीय व जागतिक भाषांमध्ये झालेला अनुवाद त्यांच्या विचारांची अन् साहित्याची उत्तुंग उंची दर्शवतो."

     पुढे बोलताना ते म्हणाले, "आपआपसातील वैचारिक मतभेद विसरून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आणि समतेच्या विचारांची मोट बांधणे आज गरजेचे आहे. हजारो वर्षांच्या बुरसटलेल्या विचारांविरुद्ध फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी क्रांती केलेला समाज आता भूतकाळातील अन्यायाचा जाब विचारू लागला आहे. समाजात असा जाब विचारला जाऊ नये, म्हणूनच काही घटकांकडून जाती-जातींमध्ये विषमता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी शिक्षित, साहित्यिक आणि विचारवंत मंडळींनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत."
       अण्णाभाऊंच्या प्रसिद्ध काव्यपंक्तींचा संदर्भ देत भंते धम्मदीप म्हणाले, "जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भिमराव" या ओळींमधील 'घाव' म्हणजे जातीव्यवस्था, विषमता आणि अन्यायाच्या जखमा आहेत. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हाच एकमेव जालीम उपाय सांगितला आहे. "अंधारातून काढून मज, दाखवून गेले नवा ठाव; माणूस म्हणून जगायला हक्क सांगून गेले भिमराव" या ओळींमधून स्पष्ट होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नेते नव्हते, तर अन्यायाने होरपळलेल्या समाजाच्या जखमेवर फुंकर घालून समतेची दिशा दाखवणारे दीपस्तंभ होते.
         या सोहळ्याला ज्येष्ठ नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, डॉ. सुधीर कोलप, चंद्रकांत चौधरी, हणमंत साबळे, आप्पासाहेब (मामा) साबळे, जगन्नाथ आठवले, जी. डी. दांडे, सचिन ऐवळे, शहाजीराव मोरे, गणपती चवडीकर, अविनाश कांबळे, किशोर होवाळ, विनोद साबळे, शंकर कांबळे, शिवाजी लांडगे, जितेंद्र बनसोडे, सुशांत कांबळे, बाळासाहेब गोतपागर, नितीन कांबळे, मिलिंद कदम, अरविंद कांबळे, बाळासाहेब कांबळे, कन्हैयाकुमार जगधने, तानाजी वाघमारे, विनोद सवणे, देवानंद कांबळे, आकाश बनसोडे, अमरिश थापा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिवाजी वाघमारे यांनी केले. या सोहळ्यानंतर गणपती चवडीकर यांच्या वतीने उपस्थित नागरिकांना जलेबी वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments