Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

तेलंगणा वनविभाग व पोलिसांची दादागिरी? शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप;

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*तेलंगणा वनविभाग व पोलिसांची दादागिरी? शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल*

*



जिवती:-
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील संगणापूर गावात गंभीर प्रकार घडल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि पोस्टनुसार, तेलंगणा राज्यातील वनविभाग व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर चालवून पीक उद्ध्वस्त केले. संबंधित जमिनीवर वृक्षलागवड करण्याची तयारी सुरू असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
या घटनेमुळे सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी या प्रकरणात स्थानिक आमदार, खासदार तसेच त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना लोकप्रतिनिधी झोपले आहेत का?" असा सवाल केला आहे.
सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीत अशा प्रकारची कारवाई झाल्याचा दावा अत्यंत गंभीर मानला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी संबंधित घटनेबाबत तेलंगणा वनविभाग, पोलीस प्रशासन किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत माहिती व संबंधित प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments