Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

विंचू दंश झालेल्या रुग्णाच्या उपचारास विलंब? प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील परिचारिका तेजस्विनी कुळसंगे यांच्या कडुन रुग्नाशी उद्धट पणा

   महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 




विंचू दंश झालेल्या रुग्णाच्या उपचारास विलंब? प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील परिचारिका तेजस्विनी कुळसंगे यांच्या कडुन रुग्नाला  गैरवर्तणूक 
आणी उद्धट पणे बोलभाषा


पाटण ११/७/२०२६ विंचू दंश झाल्यानंतर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे दाखल झालेल्या एका रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित रुग्णाने परिचारिकेच्या उद्धट वर्तनामुळे उपचारास विलंब झाल्याचा प्रकार परिचारीका तेजस्विनी कुळसंगे कडुन झाला आहे.

 राहुल मसुरे यांना , विंचवाने दंश केल्यानंतर रुग्ण तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे उपचारासाठी पोहोचला असता . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ इंजेक्शन देण्याचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. मात्र, त्यावेळी ओपीडीमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका तेजस्विनी कुळसंगे यांनी, "तुला आताच इंजेक्शन देणार नाही, चुपचाप तिकडे बस," आणी काय इंजेक्शन घेतल्या बरोबर थोडच कमी होणार आहे का असे उद्धट पणे बोलुन उपचारासाठी विलंब केला

रुग्णाच्या म्हणण्यानुसार, तीव्र वेदना होत असल्याचे वारंवार सांगूनही त्याला सुमारे अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. रुग्णासोबत असलेल्या त्यांच्या आईनेही उपचार तातडीने सुरू करण्याची विनंती केली असता रुग्णांच्या आईला सुद्धा उद्धटपणे परिचारीका आरे कारे च्या भाषेत बोलले व रुग्नासोबत सुद्धा उद्धटपणे बोलत होत्या , मात्र त्यानंतरही काही काळा नंतर उपचार करण्यात आला परंतु जाणुन बुजुन विलंब केला आहे 

विंचू दंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अपेक्षित असताना झालेल्या कथित विलंबामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची संबंधित आरोग्य विभागाने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच दोषी आढळल्यास आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्वतः पत्रकार राहुल मसुरे यांची आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण मध्ये रुग्णांना तेजस्विनी कुळसंगे ह्या परिचारीका उद्धटपना ची भाषा बोलतात 

(संबंधित परिचारिका किंवा आरोग्य विभागाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Post a Comment

0 Comments