महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
माराई पाटण ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावात शुद्ध पाणी व नळपाणीपुरवठा बंद – प्रदीप काळे
माराई पाटण (ता. जिवती) येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माराई पाटण गावात मागील सहा दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा बंद असून, RO (आरो) शुद्ध पिण्याच्या पाण्याची सेवाही बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा आरोप अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप काळे यांनी केला आहे.
प्रदीप काळे यांनी म्हटले आहे की, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असतानाही नागरिकांना कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत.
या समस्येची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने RO शुद्ध पाणी सेवा आणि नळपाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, तसेच पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारणांची माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी प्रदीप काळे यांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
– प्रदीप काळे
अनुसूचित जाती विभाग काँग्रेस
तालुका अध्यक्ष, जिवती



0 Comments