Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

प्राथमिक आरोग्य केंद्र शेंणगाव अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णालय कुचकामी त्वरित मनुष्यबळाची पुरतता करा अमोल कांबळे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


प्राथमिक आरोग्य केंद्र शेंणगाव अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णालय कुचकामी 

त्वरित मनुष्यबळाची पुरतता करा अमोल कांबळे 

जिवती - शेंणगाव येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे रुग्णालयाला अनेक वर्षे होऊनही रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता आहे शेंणगाव येथील रुग्णालय हे तालुक्यातील नागरिकांना मध्यस्ती असल्यामुळे खेड्यातपाड्यातील नागरिकांना हो दवाखाना सोईचा वाठतो त्यामुळे रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात.मात्र दुर्दैवी बाब रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याने नागरिकांनाची गैरसोय होत आहे नागरिकांना हवे तसी सुविधा मिळत नाही आहे.त्या कारणाने नागरिकांना पर्याय शोधावा लागत आहे रुग्णालयाच्या या ठीसाळ कारभारामुळे नागरिकांना ना इलाज खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे याची गंभीरता लक्षात घेत अमोल कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात त्वरित मनुष्यबळाची पुरवठा करा अन्यथा आंदोलन करन्याचा इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments