Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली येथे अशोक विजयादशमी निमित्त ‘जागर महामातांचा’ ७ दिवसीय प्रबोधन पर्व उत्साहात

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 


बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली येथे अशोक विजयादशमी निमित्त ‘जागर महामातांचा’ ७ दिवसीय प्रबोधन पर्व उत्साहात

*सांगली, दि. १६ ऑक्टोबर २०२६ -* बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली येथे अशोक विजयादशमी निमित्त *दि. १० ते १६ ऑक्टोबर २०२६* या कालावधीत *‘जागर महामातांचा’* हा ७ दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रम *अत्यंत व्यवस्थितपणे सुरू आहे.* आज दि. 20 रोजी सायंकाळी ७ वाजता या पर्वाचा समारोप होणार आहे.

या ७ दिवसीय पर्वाचे आयोजन बौद्ध धम्म संस्कार संघाच्या वतीने करण्यात आले असून दररोज सायंकाळी विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने होत आहेत.

*कार्यक्रमाची दिवसवार वैशिष्ट्ये:*

*दि. १० व ११ ऑक्टोबर - भगिनीभाव जोपासताना - डॉ. वैशाली पवार:* कोणत्याही क्षेत्रात काम करताना भगिनीभाव असला पाहिजे. *महामाया प्रजापती गौतमी* या पहिल्या भिक्खुनीपासून *माता यशोधरा, माता रमाई, सावित्रीबाई फुले* यांच्यापर्यंत सर्व महामातांनी विजमतावादी प्रवाह जपला. भगिनीभाव म्हणजे मानसिक आधार व एकमेकींना समजून घेणे असल्याचे त्यांनी सांगितले.

*दि. १२ व १३ ऑक्टोबर - भगिनीभावाचे स्वरूप:* यावेळी निंदा करणे, टोमणे मारणे आणि असमाधानी वृत्ती टाळून *पारदर्शिता आणि गोपनीयता* या दोन तत्त्वांवर भगिनीभाव कसा टिकतो यावर चर्चा झाली. याचे फायदे म्हणून नणंद-भावजय, सासू-सून यांचे संबंध सुधारतात असे सांगण्यात आले.

*दि. १४ व १५ ऑक्टोबर - आरक्षण आणि महिलांची भूमिका - संगीता शिंदे:* या दिवशी *आरक्षण - न्यायाची आणि गावठीची कथा* या विषयावर चर्चा झाली. *काका कालेलकर आयोग, मंडल आयोग* पासून ते *SC, ST, OBC* प्रवर्गापर्यंत आरक्षणाचा इतिहास सांगण्यात आला. महाराष्ट्रात *५२ जाती (१५४ उपजाती) - ४० महार, २४ मांग, १६ चांभार* या बहुजन समाजाच्या आकडेवारीवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च, UPSC, MPSC, आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा, *खाजगीकरणामुळे नोकऱ्यांची बिकट स्थिती*, महिला सुरक्षितता आणि *८०% प्रॅक्टिकल काम व २०% प्रबोधन* हा संदेश देण्यात आला. १० वर्षात १००% आरक्षणाची गरज आणि २९४ जागांमध्ये सामाजिक प्रतिनिधित्व या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

*दि. १६ ऑक्टोबर - समारोप - बहुजन आंबेडकरी चळवळ व बहुजन महिलांची भूमिका - प्रवक्त्या आयु. प्रमोदीनी (विनोदीनी) मिरजकर:* आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे *प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख आयु. दिपाली कांबळे* यांनी करून दिली. त्यांनी प्रवक्त्या आयु. विनोदीनी मिरजकर यांची ओळख करून देताना त्या *सामूहिक शिक्षण संस्थेच्या उपमुख्याध्यापक* असून *फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या* असल्याचे सांगितले.

प्रमुख प्रवक्त्या *आयु. विनोदीनी मिरजकर* यांनी *बहुजन आंबेडकरी चळवळ व बहुजन महिलांची भूमिका* या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, *सुशिक्षित मुलींनी समाजाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.* स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही तर *विचार विकास* आहे. *हिंदू कोड बिल* हे महिलांच्या मुक्तीचा जाहीरनामा असून बाबासाहेबांनी त्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. *राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला* प्रोत्साहन देऊन जातीअंताचे पाऊल टाकले. *शांताबाई सरोदे, सावित्रीबाई बोरोडे* यांसारख्या महामातांनी *अत्त दीप भव’ - स्वतःच स्वतःचा दिवा बना हा बुद्धाचा संदेश आचरणात आणला.

शेवटी आचार, विचार आणि कृती या त्रिसूत्रीवर भर देत महिलांनी संघटित होऊन शिक्षण आणि संघर्ष केला पाहिजे असा संदेश देण्यात आला.

या ७ दिवसीय कार्यक्रमास श्रावस्ती विहारात उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध धम्म संस्कार संघ, सांगली यांच्या वतीने करण्यात आले.

स्थळ: श्रावस्ती बुद्ध विहार, सांगली
भवतु सब्ब मंगलम् - नमो बुद्धाय, जय भीम

Post a Comment

0 Comments