Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती वनपरिक्षेत्रात सागवाण तस्करीचा पर्दाफाश; पिकअप वाहनासह ६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 



 *जिवती वनपरिक्षेत्रात सागवाण तस्करीचा पर्दाफाश; पिकअप वाहनासह ६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात* 

जिवती, दि. ०९ ऑगस्ट २०२६ : मा. योगेश वाघाये साहेब, उपवनसंरक्षक मध्यचांदा (चंद्रपूर) तसेच मा. मंगेश गिरडकर साहेब, उपविभागीय वनाधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. ए. डी. खोब्रागडे मॅडम, जिवती वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने सागवाण लाकडाच्या अवैध तस्करीविरुद्ध धडक कारवाई केली.

जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सागवाण लाकडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून सापळा रचला. संशयित पिकअप वाहनाचा मागोवा घेत शेनगाव परिसरात तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सागवाण लाकूड पिकअप वाहनाच्या सहाय्याने वाहतूक करून परिसरात लट्ट्यांचा साठा केल्याचे निदर्शनास आले.

रात्रोच्या गस्ती दरम्यान अडवण्यात आलेल्या पिकअप वाहनात सागवाण तस्करीच्या खुणा व वाहतुकीचे अवशेष आढळून आल्याने वाहन जप्त करण्यात आले. तसेच सागवाण लाकडाचे लठ्ठेही जप्त करण्यात आले.

या कारवाईत सागवाण लाकूड व पिकअप वाहन असा एकूण अंदाजे ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सागवाण लाकडाची किंमत सुमारे १ लाख २१ हजार रुपये तर वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.

वनविभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत ४ आरोपींना ताब्यात घेतले असून काही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. तस्करीमागील मोठ्या रॅकेटचा शोध घेण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे.

या कारवाईत मा. एस. एम. सलामे (क्षेत्रसहायक, शेनगाव), मा. एस. व्ही. सावसागडे (क्षेत्रसहायक), मा. एन. आर. चापले (क्षेत्रसहायक, पाटण) मा.ए.एम.गेडाम क्षेत्रसहायक जिवती तसेच मा. ए. डी. गोरकर, अविनाश राठोड, सय्यद, एम. ई. मोरे, पी. एच. कोवे, आर. सी. टेकाम (वनरक्षक) व इतर वनकर्मचारी सहभागी होते. सर्वांनी समन्वयाने साखळी रचून ही कारवाई यशस्वी केली.

वन विभागाकडून अवैध वृक्षतोड, सागवाण तस्करी व अवैध वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग सतर्क असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments