Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

महापुरुषांचे विचार आत्मसात करा त्यातूनच समाजाची खरी प्रगती व्याख्याते अजिंक्य भैय्या चांदणे*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*महापुरुषांचे विचार आत्मसात करा त्यातूनच समाजाची खरी प्रगती व्याख्याते अजिंक्य भैय्या चांदणे* 
जिवती- १- जिवती तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे विश्वरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचाराचा जागर करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये श्री देवराव दादा भोंगळे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र व श्री अजिंक्य भैय्या चांदणे, बीड यांनी रॅलीला उपस्थित राहून महापुरुषांना अभिवादन करून पारंपारिक बँडच्या गजरात रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी महापुरुषांचे जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका समोर झेंडावंदन करण्यात आले.व त्यानंतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे राज्य समन्वयक सकल मातंग समाज तर उद्घाटक श्री जी एस कांबळे ज्येष्ठ विचारवंत गडचांदूर व प्रमुख व्याख्याते अजिंक्य भैय्या चांदणे बीड श्री भानुदास जाधव, सुग्रीव गोतावळे, अमर राठोड, विजय गोतावळे नबिलास भगत, बालाजी सोनकांबळे, किरण पवार श्यामराव गेडाम, सुबोध चिकटे युवा उद्योजक संतोष मोतेवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मातंग समाजातील गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महापुरुषांनी संकटाशी झुंज देत इतिहास घडवला व त्यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या त्यातूनच समाज उभा झाला ही प्रेरणा म्हणूनच जयंती साजरी करत असल्याचे प्रतिपादन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचे असेल तर मातंग समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही अजिंक्य भैय्या चांदणे यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणातडॉ. अंकुश गोतावळे यांनी समाजाला प्रगती पथावर न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय प्रगती नाही आपल्या पुढील अनेक महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरीबी दूर करण्यासाठीचे समाज व स्वतःची प्रगती करण्याचे विचार आत्मसात करायचे असेल तर महापुरुषांच्या विचाराबरोबरच शिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याचे व मातंग समाजाला आरक्षण किती महत्वाचे आहे याचे अनेक दाखले त्यांनी सांगितले. या उत्सवाचे व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी श्री भानुदास जाधव उपाध्यक्ष श्री चरणदास केदासे नवनाथ जांभळे, व्यंकटी कोटंबे सर, बाळू मस्के, पद्माकर पोतवळे ,माऊली पवार, रविकांत कोमले, अंबादास कंसकटले, रमाकांत जगापल्ले पंढरी वाघमारे, गजानन गायकवाड, दत्ताजी तोगरे, देविदास कांबळे, दिगंबर कलवले, मारोती मोरे,यादव भालेराव, नामदेव जाधव, शिवाजी शिव मोरे, शेषराव कांबळे, केरबा कोंबले, श्रीधर अर्जुने, विलास वाघमारे, बालाजी कोमले, माधव सागरे, गोविंद गायकांबळे रंजीत सूर्यवंशी, लहुजी गोतावळे पांडुरंग भालेराव, अनिल बसवंते,इत्यादींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंबादास कंसकटले व देविदास कांबळे यांनी केले तर आभार श्री व्यंकटी कोटंबे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments