सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
राज आटकोरे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य; सामाजिक न्यायाच्या लढ्याला मिळणार नवी दिशा
सांगली : वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते इंजि. प्रा. राज आटकोरे यांचे सांगली जिल्ह्यात आगमन होताच वंचित बहुजन आघाडी आणि माथाडी कामगार युनियनच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
राज आटकोरे यांच्या आगमनाने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. सामाजिक न्याय, वंचितांचे प्रश्न आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा संघटक किशोर आढाव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी (पवन) वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव जितेंद्र कोलप यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय भीम | जय संविधान | बहुजन हिताय, बहुजन सुखाय!



0 Comments