महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात रक्तदान शिबिर; ११० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
**चंद्रपूर, दि. २९ ऑगस्ट २०२६ :** अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. ईश्वर कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात तब्बल **११० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.** यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस दल, होमगार्ड जवान, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी तसेच पोलीस जिम ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजाप्रती असलेली पोलीस दलाची बांधिलकी अधोरेखित झाली. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रमातून तो साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, होमगार्ड जवान आणि पोलीस जिम ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे **जिल्हाध्यक्ष परमेश्वर बळीराम चव्हाण** तसेच **जिल्हा उपाध्यक्ष मुकेश प्रकाश चव्हाण** यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.
**जय हिंद!**



0 Comments