Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याला नवी दिशा; संघटनेच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी विजय गोतावळे यांची नियुक्ती*

*रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याला नवी दिशा; संघटनेच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प*

हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:-महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी विजय गोतावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रवीण समाधान भाटेकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष सुरज यादव यांनी विजय गोतावळे यांची नियुक्ती केली.
रुग्णसेवा हे मानवतेचे सर्वोच्च कार्य असून, संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजातील गोरगरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देत रुग्णसेवा व सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांना नवजीवन देण्याचे कार्य पुढेही सातत्याने सुरू राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
विजय गोतावळे यांनी संघटनेच्या माध्यमातून रुग्णसेवा, श्रमिकांचे प्रश्न तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, कामगार व रुग्णसेवा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मानवसेवेतून समाजसेवा आणि समाजसेवेतून मानवतेचा संदेश देत विजय गोतावळे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसेवा व श्रमिकांच्या हितासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments