Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शैक्षणिक परिसरातील प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा तीव्र विरोध**विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; एसडीएमकडे सविस्तर निवेदन, काम न थांबल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*शैक्षणिक परिसरातील प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा तीव्र विरोध*

*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; एसडीएमकडे सविस्तर निवेदन, काम न थांबल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा*

हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

राजुरा:- राजुरा शहरातील महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र.
२६६ (राजुरा–आसिफाबाद मार्ग)वरील रेल्वे गेटलगत शैक्षणिक परिसरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का उभारण्याच्या कामास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाने तीव्र विरोध दर्शवित उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी(एसडीएम)यांना सविस्तर जनहिताचे निवेदन सादर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट)सामाजिक न्याय विभागाचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अमोल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात,दक्षिण मध्य रेल्वेकडून रेल्वे गेटलगत सुरू असलेल्या मालधक्का उभारणीच्या कामामुळे भविष्यात विद्यार्थी,पालक, नागरिक,व्यापारी तसेच वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रस्तावित मालधक्का परिसरालगत श्री.शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,श्री. शिवाजी हायस्कूल,आदर्श हायस्कूल,न्यू इरा इंग्लिश स्कूल, समाज कल्याण चे वसतिगृह,आयटीआय, टेक्निकल संस्था, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल,कल्याण नर्सिंग कॉलेज,स्व.रामचंद्रराव धोटे कॉलेज,ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आदी शैक्षणिक संस्था असून सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज या मार्गाचा वापर करतात.

राजुरा–आसिफाबाद हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून आधीपासूनच या मार्गावर मोठ्या प्रमाणात आंतरराज्य अवजड वाहतूक सुरू आहे.त्यातच रेल्वे गेट वारंवार बंद राहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते.या पार्श्वभूमीवर याच ठिकाणी मालधक्का सुरू झाल्यास अवजड वाहनांची संख्या वाढून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.तसेच वाहतूक कोंडी,ध्वनी व वायू प्रदूषण,आपत्कालीन सेवांमध्ये होणारा विलंब आणि शैक्षणिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निवेदनातून अधोरेखित करण्यात आली.

या प्रकल्पाचा स्वतंत्र वाहतूक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम अभ्यास करून स्थानिक नागरिक,पालक, शैक्षणिक संस्था आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात यावी.तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रस्तावित मालधक्का शहराबाहेरील योग्य जागेवर स्थलांतरित करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.

या मागण्यांची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), स्थानिक नागरिक,पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने संविधानिक व लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष संतोष डेरकर, शहराध्यक्ष रकीब शेख, मेहमूद मुसा,राहुल अंबादे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments