Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

सर्पदंशाने सगणापूर येथील युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी*

जिवती तालुका प्रतिनिधी गोविंद गोरे


*सर्पदंशाने सगणापूर येथील युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी*


जिवती, दि. २ ऑगस्ट: जिवती तालुक्यातील मौजा सगणापूर येथील युवा शेतकरी शुभम बाबाराव पोले (वय २२ वर्षे) यांचा शेतीची कामे करत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सगणापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पोले हे आपल्या शेतात नियमित शेतीची कामे करत असताना विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शुभम हे मेहनती, कष्टाळू आणि होतकरू युवा शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामीण भागात शेती करताना सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेची दखल घेऊन शासनाने सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शुभम पोले यांच्या कुटुंबाला वन्यप्राणी हल्ला अथवा शासनाच्या लागू असलेल्या संबंधित मदत योजनेंतर्गत तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित विभागाने प्रकरणाची त्वरित चौकशी करून पात्रतेनुसार मदत मंजूर करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments