Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगाव येथे कायमस्वरूपी लाईनमन द्या ग्रामस्थांची मागणी*

जिवती तालुका प्रतिनिधी गोविंद गोरे 


*शेणगाव येथे कायमस्वरूपी लाईनमन द्या ग्रामस्थांची मागणी*

जिवती:तालुक्यातील शेणगाव, येथे साडेचार ते पाच हजार लोकसंख्या असूनही गावात मुख्यालयी कायमस्वरूपी लाईनमन नसल्याने ग्रामस्थांना वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेणगाव येथे तातडीने कायमस्वरूपी लाईनमन नियुक्त करून मुख्यालयी राहुन सेवा देईल असाच लाईमेन नियुक्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या कंत्राटी कर्मचारी दिवसा वीज दुरुस्तीची कामे करतात. मात्र सायंकाळनंतर वीज बिघाड झाल्यास तक्रार करण्यासाठी अथवा दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध राहत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
शेणगाव हे परिसरातील सात ते आठ गावांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे कायमस्वरूपी लाईनमन उपलब्ध झाल्यास या सर्व गावांतील वीज समस्यांचे निराकरण सुलभ होणार आहे.
याबाबत यापूर्वी वारंवार तोंडी सूचना तसेच लेखी अर्ज देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांत शेणगाव येथे मुख्य लाईनमन नियुक्त करावा, अन्यथा शेणगाव व परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन संबंधित कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अर्जाद्वारे देण्यात आला आहे.
याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून शेणगावला कायमस्वरूपी लाईनमन देण्याची मागणी वैजनाथ माधव सावरगावे यांच्यासह ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अभियंता जिवती यांच्यासह,अधीक्षक अभियंता चंद्रपूर,तसेच कार्यकारी अभियंता बल्लारपूर यांच्याकडे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments