Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

कुपवाडमध्ये आंबेडकर पुतळ्यासाठी जनआक्रोश;* *महापालिकेला झटका देणारे आंदोलन, ठरावाचा मार्ग मोकळा!**सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मुख्यालय*

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 


*कुपवाडमध्ये आंबेडकर पुतळ्यासाठी जनआक्रोश;* *महापालिकेला झटका देणारे आंदोलन, ठरावाचा मार्ग मोकळा!*

*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मुख्यालय* 

कुपवाड : महावीर व्यायाम मंडळ नजिकच्या सि. स. नं. ७७४ या महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार (दि. २०/०८/२०२६) रोजी कुपवाडमध्ये अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. बहुजन समाजाच्या अस्मितेशी निगडित या प्रश्नावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कुपवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाकडे दि. ०१/०४/२०२६ रोजीच रितसर निवेदन देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज महापालिका मुख्यालयासमोर घोषणांचा प्रचंड गजर करत परिसर दणाणून सोडला.
“पुतळा आपल्या बापाचा... लढा आपल्या हक्काचा!”,
“आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा!”,
“भारतीय संविधानाचा विजय असो!”
अशा कडक, भडक घोषणांनी वातावरण पेटून उठले.

दरम्यान, याच जागेवर आधी फक्त ध्वजस्तंभ व परिसर विकासाचा ठराव असताना अचानक “कै. आमदार शरद पाटील स्मृती उद्यान” प्रस्ताव पुढे आणल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “स्मृती उद्यानाला विरोध नाही; पण आंबेडकर पुतळ्याला प्राधान्य द्या!” असा इशारा दिला.

आंदोलनाची तीव्रता पाहता अखेर महापौर मा. धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, तसेच अनेक नगरसेवक आणि अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.
महापौरांनी ठाम शब्दांत जाहीर केले की,
“कुपवाडमध्ये महानगरपालिकेच्या खर्चातून भव्य, दिव्य व आकर्षक पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारला जाईल आणि याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्यात येईल!”

यावेळी उपमहापौर गजानन मगदूम यांनीही पुतळ्यासाठी स्वतःच्या निधीतून सहकार्य करण्याची ग्वाही देत आंदोलनकर्त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनात प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मधुकर शेस्वरे, अशोक कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, विनायक मोरे, बंदेनवाज राजरतन, दिपक कांबळे, अनिल सावंत, ॲड. श्रीनाथ कांबळे, क्रांती कांबळे, रूपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बन्सी कांबळे, दिक्षा पवार, बाबासाहेब कांबळे, महावीर कांबळे, चंद्रकांत खरात, किशोर आढाव, गौतम भगत, हिरामण भगत, आनंदा कांबळे, पंकज धोतरे, उत्तम कांबळे, हणमंत साबळे, जितेंद्र कोलप, रतन तोडकर, दादासाहेब मोरे, विवेक थोरले, संतोष सरवदे, संजीव साबळे, संतोष कांबळे, वैभव कांबळे, प्रवीण कांबळे, निखिल आठवले, अमित लांडगे, सागर सावंत, वैभव रांजणे, लिंगाप्पा कांबळे, विशाल वाघे, लक्ष्मण बुधनाळे, जगजीवन सातपुते,राज धोतरे, प्रीतम सरोदे यांच्यासह फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

एकूणच, कुपवाडमधील हा जनआक्रोश केवळ पुतळ्यासाठी नसून संविधान, समता आणि बहुजन स्वाभिमानाचा लढा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता महापालिकेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत प्रत्यक्षात ठराव मंजूर करून कामाला गती देणे, हीच खरी कसोटी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments