Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील माती बंधाऱ्यांच्या कामांची विभागीय चौकशी करा; दोषींवर कारवाईची मनसेची मागणी

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील माती बंधाऱ्यांच्या कामांची विभागीय चौकशी करा; दोषींवर कारवाईची मनसेची मागणी


जिवती:-
जिवती तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत सन २०२६ मध्ये करण्यात आलेल्या माती बंधाऱ्यांच्या कामांची विभागीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिवती तालुका हक्कानी शेख तालुकाध्यक्षांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय जिवती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिवती तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, जलसंधारण वाढावे आणि भूजल पातळीत सुधारणा व्हावी या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर माती बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. ही योजना सार्वजनिक निधीतून राबविण्यात येणारी शेतकरी हिताची महत्त्वाची योजना असून तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व गुणवत्तेचे निकष काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे.

मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे, तांत्रिक निकषांचे कथित उल्लंघन, अपूर्ण कामे, दर्जाहीन अंमलबजावणी तसेच शासनाच्या निधीचा कथित अपव्यय झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मनसेने या प्रकरणाची स्वतंत्र विभागीय व तांत्रिक चौकशी करून संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, दोष निश्चित करावेत आणि दोषी ठेकेदार, संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच दोषींमुळे शासनाच्या निधीचे नुकसान झाले असल्यास त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करून संबंधितांविरुद्ध आवश्यक फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. सार्वजनिक निधीचा प्रत्येक रुपया नियमानुसार आणि गुणवत्तापूर्ण कामांवरच खर्च झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही हकानी शेख तालुका अध्यक्ष यांनी निवेदनातून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments