Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

आश्रम शाळा व वसतिगृहांसाठी मोठे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ३६ महत्त्वाच्या सूचना**जिवती शासकीय आदिवासी आश्रम शाळा व वस्तीगृहाची उच्चस्तरीय चौकशी करा – शब्बीर जागीरदार*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*आश्रम शाळा व वसतिगृहांसाठी मोठे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ३६ महत्त्वाच्या सूचना*

*जिवती शासकीय आदिवासी आश्रम शाळा व वस्तीगृहाची उच्चस्तरीय चौकशी करा – शब्बीर जागीरदार*


जिवती : राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शासनाने आश्रम शाळा व वसतिगृहांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात ३६ महत्त्वाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडील काही गंभीर घटनांनंतर आश्रमशाळांमधील सुरक्षा, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक कडक करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्राचे विदर्भ अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शब्बीर जागीरदार यांनी जिवती येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा व वस्तीगृहाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे.
शब्बीर जागीरदार यांनी म्हटले आहे की, शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर मार्गदर्शक सूचना दिल्या असताना त्या प्रत्यक्षात कितपत राबवल्या जात आहेत, याची वस्तुनिष्ठ तपासणी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निवासाची सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, वसतिगृहातील देखरेख, सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षा रक्षक, वैद्यकीय तपासणी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
राज्यातील आश्रमशाळांमधील सुरक्षेच्या प्रश्नांनी अलीकडे गंभीर स्वरूप धारण केले असून, काही घटनांनंतर शासनालाही कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिवतीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने कोणतीही दिरंगाई न करता चौकशी समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी, त्रुटी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या सर्व ३६ सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी शब्बीर जागीरदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments