Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

अभिषेक माध्यमिक विद्यालय चिखली ( खू ) येथे स्वातंत्र्य दिन साजरा*.

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*अभिषेक माध्यमिक विद्यालय चिखली ( खू ) येथे स्वातंत्र्य दिन साजरा*.

दि. १५ ऑगस्ट २०२६ रोज शनिवार ला अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली (खू) येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी "भारत माता की जय" या जय घोषात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नुकताच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य केलेल्या व सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत गीत कु. राजनंदनी वाळके, कु.गंगा पिटलेवाळ, प्रिया भोईनवाळ, यांनी गायले व कु.पायल कांबळे,ओजल गायकवाड,अंजली कांबळे, कु.कोमल देवकते, यांनी देशभक्तीपर गीत गायले. कु.मेगा ,अमोल रेनेवाड ,अर्जून तोगरे कु, सुवर्णा सुरणर,यांनी.स्वतंत्र दिना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.ध्वजारोहण अध्यक्ष म्हणून मा.श्री.दत्ता पाटील बोळगिर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक मा.श्री.अंगद गायकवाड सर,व मार्गदर्शक श्री. सुभाष राठोड सर,प्रमुखअतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, मा.सदस्य श्री.मलकार्जुन पा.सुरनर, श्री.अशोक चव्हाण,श्री देविदास राठोड,श्री शेषेराव पाटील बोळगिरी,श्री फारूख शेख, श्री शिवरामजी श्री. सूर्यभानजी केदासे हे होते .
८० वा स्वातंत्र्य दिना संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंगद गायकवाड सरांनी उपस्थिताना अनमोल असे मार्गदर्शन केले.
कवायत (Lang March) , व सूत्रसंचालन श्री एस.एल.गेडाम सरानी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एम. बी. पट्टेवाले सर यांनी केले.तर आभार श्री.ए.के.लदाफ (शेख) सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते करिता श्री.ए.पी.गेडाम सर,श्री.जे.बोळगिर सर, श्री बी. बी.मुर्किकर ,श्री एफ .एम. पठाण श्री टी.आर.वाघमारे यांनी परिश्रम केले

Post a Comment

0 Comments