Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

कर्जमाफीच्या यादीचा गैरफायदा घेणारे दलाल जिवती तालुक्यात सक्रिय?**कर्जमाफी यादीत नाव टाकतो, आधार कार्ड द्या अन् पैसे द्या” म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव; बँक व्यवस्थापकांकडे सामाजिक कार्यकर्त्यांची धाव*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*कर्जमाफीच्या यादीचा गैरफायदा घेणारे दलाल जिवती तालुक्यात सक्रिय?*

*कर्जमाफी यादीत नाव टाकतो, आधार कार्ड द्या अन् पैसे द्या” म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव; बँक व्यवस्थापकांकडे सामाजिक कार्यकर्त्यांची धाव*


जिवती तालुका:- शेतकरी कर्जमाफीच्या यादीचा गैरफायदा घेत काही दलाल जिवती तालुक्यात गावोगावी फिरत असल्याची चर्चा सुरू झाली असून, कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या अशिक्षित व भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या कडून आधार कार्ड आणि पैशांची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. “तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करून देतो”, असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत दि.४ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर जागीरदार, आरिफ शेख डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष, हकानी शेख मनसे तालुकाप्रमुख, सलीम शेख सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. भारतीय स्टेट बँक, पाटण शाखेचे व्यवस्थापक महेश नेवारे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत चर्चा केली.
यावेळी बँक व्यवस्थापकांनी संबंधित विषयाची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणतीही व्यक्ती शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, कागदपत्रे किंवा पैसे मागत असल्यास सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
दलालांच्या आमिषाला बळी पडू नका!
कर्जमाफी योजनेच्या नावाखाली कोणीही व्यक्ती गावात येऊन “तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत टाकतो”, “कर्जमाफी करून देतो” किंवा “यासाठी आधार कार्ड आणि पैसे द्या” अशी मागणी करत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ भारतीय स्टेट बँक, पाटण शाखेच्या व्यवस्थापकांशी तसेच संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कर्जमाफीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या दलालांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनेत पारदर्शकता राखून खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने गावपातळीवर जनजागृती करणे गरजेचे आहे.
“कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा; कोणत्याही दलालाला आधार कार्ड किंवा पैसे देऊ नका,” असा स्पष्ट संदेश 
"महेश नेवारे शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक पाटण"
 यांच्याकडून
शेतकरी बांधवांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments