Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

विदर्भातील ११ जिल्ह्यांत पत्रकार संरक्षण संघाच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार**पत्रकार बांधवांनी संघटनेत काम करण्यासाठी पुढे यावे; विदर्भ प्रांताध्यक्ष शब्बीर सय्यद जागीरदार यांचे आवाहन*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

प्रेस नोट 

*विदर्भातील ११ जिल्ह्यांत पत्रकार संरक्षण संघाच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार*

*पत्रकार बांधवांनी संघटनेत काम करण्यासाठी पुढे यावे; विदर्भ प्रांताध्यक्ष शब्बीर सय्यद जागीरदार यांचे आवाहन*


जिवती:- पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नाथा देवराम उंद्रे (पाटील) यांच्या आदेशानुसार विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पत्रकार संरक्षण संघाच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या विविध समस्या, अडचणी आणि हक्कांसाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाने आवाज उठविण्यास इच्छुक असलेल्या पत्रकारांनी संघटनेत सहभागी होण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष शब्बीर सय्यद (जागीरदार) यांनी केले आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या ११ जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी संघटितपणे काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र व इच्छुक पत्रकारांनी संघटनेशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकारांवर होणारे अन्याय, पत्रकारितेच्या क्षेत्रातील अडचणी तसेच पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा संघटनेचा उद्देश आहे. त्यामुळे विदर्भातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन पत्रकार संरक्षण संघाच्या कार्यात सहभागी व्हावे, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा :
शब्बीर सय्यद (जागीरदार)
विदर्भ प्रांताध्यक्ष, पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र
मोबाईल : ९६२३८९६५७४

Post a Comment

0 Comments