Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

भारी पोलीस स्टेशनच्या वाली कोण? परिसरातील जनतेचा संतप्त सवाल**‘ते तीन पोलीस कोण?’ अवैध धंदे व अवैध वाहतुकीतून कथित वसुलीच्या चर्चेला उधाण; वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे प्रश्नचिन्ह*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*भारी पोलीस स्टेशनच्या वाली कोण? परिसरातील जनतेचा संतप्त सवाल*

*‘ते तीन पोलीस कोण?’ अवैध धंदे व अवैध वाहतुकीतून कथित वसुलीच्या चर्चेला उधाण; वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे प्रश्नचिन्ह*


-: हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-

जिवती :- भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध धंदे आणि अवैध वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना काही पोलीस कर्मचारीच कथितरित्या अवैध धंदेवाल्यांकडून व अवैध वाहतूकदारांकडून वसुली करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे ‘भारी पोलीस स्टेशनच्या वाली कोण?’ असा सवाल आता परिसरातील जनता उपस्थित करत आहे.
विशेष म्हणजे, ‘ते तीन पोलीस कोण?’ अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, संबंधित पोलीस कर्मचारी कथित वसुली करत असल्याच्या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
एकीकडे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असताना, दुसरीकडे पोलिसांच्याच नावाने वसुली होत असल्याच्या चर्चेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्षाची बाब आहे का, की संबंधित कर्मचाऱ्यांना कथित वसुलीसाठी मूक संमती मिळाली आहे? असा सवालही आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिवती तालुका तेलंगणा सीमेला लागून असल्याने अवैध वाहतूक आणि विविध अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या कथित वसुलीच्या चर्चेबाबत भारी पोलीस स्टेशन आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे चर्चेत असलेल्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार का, याकडे आता जिवती तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

(प्रकाशित केलेल्या प्रत्येक बातमी शी संपादक सहमत असतील असे काही ही नाही)

Post a Comment

0 Comments