चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*गडचांदूर शहरात अवैध धंदे करणाऱ्याची मनमर्जी; की ठाणेदराचा आशीर्वाद नागरिकांमध्ये संताप*
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:- गडचांदूर शहरात वरली मटका, गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच देशी-विदेशी दारूची कथितपणे खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये वरली मटका आणि इतर अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नजरेआड कसे राहतात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध धंद्यांमुळे युवक व्यसनाधीन होत असल्याची चिंता पालक व्यक्त करीत आहेत. वरली मटका, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि मद्यविक्रीमुळे सामाजिक व आर्थिक समस्या वाढत असून कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही. मात्र, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(प्रकाशित केलेल्या प्रत्येक बातमी शी संपादक सहमत असतील असे काही नाही)



0 Comments