जिवती तालुका प्रती निधी गोविंद गोरे
*टेकामांडवा येथे तालुकास्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
जिवती:तालुक्यातील टेकामांडवा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ची सुरवात ध्वजारोहन करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद आमनर तर प्रस्ताविक विशाल सोन्नर यांनी यांनी केले,त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजाचे नाव लौकिक करणाऱ्या समाजातीला गुणवंताचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित युवा व्याख्याते विलास आमुगे (अहमदपूर जि.लातूर) यांनी अहिल्यामातेच्या संपूर्ण जीवनप्रवासावर प्रकाश टाकत राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या खऱ्याखुऱ्या रणरागिणी असून त्यांची राजनीती,अर्थनीती,धर्मनीती ही ग्राम विकासाचा पाया मजबूत करणारी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित विशेष अतिथी म्हूणन खासदार प्रतिभाताई धानोरकर, विद्यमान आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार वामनराव चटप,माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे युवा व्याख्याते दीपक चटप, धनगर समाज समिती जिल्हा अध्यक्ष संदीप शेरकी,माजी पं.स. सभापती महेश देवकते, सरपंच शुभांगी राऊत, धनगर समाज तालुका समितीचे अध्यक्ष परमेश्वर माने,सचिव तिरुपती पोले, ठाणेदार जगनाथ मडावी, खंडेराव सलगर, शिवाजी श्रीरामे,माधव डोईफोडे, रामराव शेळके, शिवनाथ सुरनर, तुकाराम कुंडगीर, तुकाराम वारलवाड,तुकाराम कोकनारे,जेष्ठ नेते भिमराव पाटील मडावी, माजी सभापती सुग्रीव गोतावळे,उत्तम कराळे, जयंती उत्सव समितीचे बालाजी नरोटे,शिवाजी माने,अंकुश आमनर,शंकर सोलनकर, मुंजाजी पोले,मुंजाजी खरात,मारोती धुळगुंडे,गंगाधर भोरे, रामचंद्र हाके,गणपत देवकते,आयोजक समितीचे बालाजी आमनर, नामदेव सलगर,रामचंद्र सलगर, गोविंद गोरे, सूरज शेंडगे,नागोराव देवकते,किशोर चांदुरे,मनोहर पोले,गोविंद केजगीर,तिरुपती सलगर,नागनाथ बोरुळे, विशाल सोन्नर,रवि आमनर,बालाजी करले,धोंडिबा पोले,अनिल भोरे, राम आमनर,गजानन नरोटे मोहन मस्के,विकास बोरुळे,रमाकांत माने,दत्ता गोरे,पांडुरंग होडबे,प्रकाश पोले,निवृती सलगर,सूर्यकांत खंडेकर,गणेश शेळके, राजाराम पोले, रामेश्वर देवकते, निवृती पोले,अशोक पोले, कोंडीबा पोले,अंकुश देवकते तसेच गावागावातुन आलेले समाज बांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागनाथ बोरुळे यांनी केले.



0 Comments