चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*एम.पी बिर्ला कंपनी रक्षक सिमेंट वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा-संतोष काकडे*
*पोलीस स्टेशन बल्लारशाहत तक्रार दाखल*
जिवती:-संतोष काकडे हल्ली राहणार बल्लारपूर यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे यांच्याकडे एम.पी बिर्ला सिमेंट कंपनीचे इंजिनीयर रिजवान शेख यांनी विनंती केली की, तुम्ही स्लॅप साठी आमच्या कंपनीची सिमेंट रक्षक सिमेंट वापरा सिमेंट चांगलं टिकाऊ आणि दर्जेदार असल्याचे मला खात्री दिली तसेच पुष्कर ट्रेडर्स बल्लारपूर यांच्याकडूनही सिमेंटची खात्री असल्याचे सांगितल्यामुळे मी माझ्या घराच्या बांधकामासाठी दि.१६ मे २०२६ रोजी एम. पी. बिर्ला कंपनीचे 28 बॅग रक्षक सिमेंट गायत्री ट्रेडर्स बल्लारपूर यांच्याकडून पुष्कर ट्रेडर्स बल्लारपूर यांच्यावतीने घेतले. घराचे सज्जे आणि मिनी स्लॅप चे काँक्रेटींग काम करण्यासाठी रक्षक सिमेंटचा वापर केला. सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत काँक्रीट टाकून ४ तास झाले त्यानंतर, सुद्धा स्लॅपचा काँक्रेट सेट झाला नाही म्हणून संतोष काकडे यांनी संबंधित दुकानदाराला सांगितले व दुकानदाराने सिमेंट कंपनीचे इंजिनीयर रिजवान शेख यांना मोबाईल द्वारे संपर्क करून सांगितले असता दुकानदार आणि इंजिनियर दोन्हीही काँक्रीट परीक्षण करण्यासाठी संतोष काकडे यांच्या घरी आले. आणी टाकलेल्या स्लॅब चे परीक्षण केले. त्या दोघांनीही स्वतःहून मिक्सर मशीन मध्ये एक - एक बॅगचे काँक्रीट तयार केले मात्र, काँक्रीट बरोबर बनत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दोघांनी पाडता पाय काढला. जाता जाता सांगून गेली की तुम्हाला आमच्या कंपनीकडून झालेला नुकसान भरपाई देण्यात येईल. मात्र काही दिवसानंतर त्यांनी संतोष काकडे यांना दोषी ठरवत तुमचे मिस्त्री बरोबर नाहीत. त्यांनी काँक्रेट बरोबर मिक्स केलं नाही. तुमच्या मिक्सर मशीन चा आर.पी.एम. बरोबर नाही. काँक्रीट स्लॅप वर पाणी क्युरिंग बरोबर केली नाही. जेव्हा की स्वतः इंजिनियर रिजवान शेख यांनी तयार केलेला काँक्रेट स्लॅप वर टाकल्यानंतर ते सुद्धा सेट झाले नाही. जर काँक्रीट माल तयार करणारे मिस्त्री चुकीची असेल तर एमपी बिर्ला कंपनीचे इंजिनीयर ज्यांनी स्वतः काँक्रीट तयार केले ते सुद्धा चुकीचे आहेत का?
दिनांक 02/06/2026 रोजी एम .पी बिर्ला कंपनीचे रिजनल मॅनेजर अभिजीत पवार यांनी स्लॅब टाकल्यानंतर सोळाव्या दिवशी स्लॅब टेस्टिंग करिता प्रेस हॅमर मशीन ने दिनांक 16/5/2026 रोजी टाकलेल्या तीन बॅग एमपी बिर्ला परफेक्ट स्लॅब वर कोरड्या जागी तसेच ओल्या जागी प्रेस केले असता स्लॅप ची कठीनाई रीडिंग 27 आली तर दिनांक 16/05/2026 रोजी रक्षक सिमेंटने टाकलेल्या ओल्या व कोरड्या असल्याची रीडिंग घेतली असता ती 0 आली जेव्हा के उत्कृष्ट दर्जाच्या स्लॅबची रीडिंग 33 एवढी यावयास हवे. तरीही एमपी बिर्ला कंपनीचे कर्मचारी सिमेंट हे निकृष्ट असल्याचे मानण्यास तयार नसून उलट संतोष काकडे व त्यांचे लेबर मिस्त्री यांनाच दोषी ठरवून मोकळे होत आहेत.
मी त्यांच्या वारंवार संपर्कामध्ये असून त्यांनी आजपर्यंत मला नुकसान भरपाई दिले नाही. आमचे सिमेंट बरोबर असून तुम्ही चुकीचे आहात असे म्हटल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल याची अपेक्षा भंग झाली म्हणून संतोष काकडे यांनी दि.३१ मे रोजी संबंधित कंपनीवर व संबंधित इंजिनियर वर फसवणीच्या गुन्हा दाखल करावा व मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीची तक्रार पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे दिलेली आहे.
सध्या घडीला मार्केटमध्ये अनेक बोगस दर्जाच्या माल विकण्यासाठी कंपन्यांनी मार्केटिंग करण्यासाठी इंजिनीयर, टेक्निकल इंजिनिअर, व प्रचारक सारख्या एजंट नियुक्त केले आहे. या प्रचाराकामुळे भोळेबाळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. तात्काळ अशा कंपनीच्या मॅनेजमेंटवर व प्रचार करणाऱ्या एजंटवर आणि दुकान थाटून माल विकणाऱ्या दुकानदाराची योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारकरत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, यांच्याकडे केली आहे.



0 Comments