सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती सकाळी 10.00 वाजता साजरी करण्यात आली प्रमुख पाहुण्या आयुष्यमती रुचिरा कांबळेमॅडम या उपस्थित होत्या सर्वप्रथम आदर्शाची धूप दीप पुष्प यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल प्रमुख पाहुण्या रुचिरा कांबळे बामणोली यांनी शाहू महाराज यांच्या बद्दल खालील प्रमाणे मुद्देनिहाय त्यांच्या राज्यकारभाराचा इतिहास सांगितला.
सामाजिक क्रांती - "बहुजन हिताय, बहुजन सुखाय"
आरक्षणाचे जनक 26 जुलै 1902 रोजी जगात सर्वात पहिले आरक्षण लागू केले. सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा मागासवर्गीय, मराठा, लिंगायत यांच्यासाठी राखीव. ब्राह्मणांच्या मक्तेदारीला तडा दिला. हेच आजच्या SC/ST/OBC आरक्षणाचे मूळ
1917 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. मुलींसाठी स्वतंत्र शाळा, वसतिगृहे बांधली.डॉ
.बाबासाहेबांचा मंत्र शाहू महाराजांनी आधीच दिला.
1917 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा केला. जातीभेद तोडण्यासाठी कायदेशीर पाऊल.
मंदिर प्रवेशदलितांना मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरी वापरण्याचा हक्क दिला. पुजारी पदासाठी सर्व जातींना परवानगी
राधानगरी धरण 1907 मध्ये सुरू केले. आशियातील पहिले स्वयंचलित धरण. हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. शेतकऱ्यांचा वाली.
शेतकऱ्यांना सावकाराच्या जोखडातून मुक्त केले.
शाहू मिल, कारखाने कोल्हापूरात गिरण्या, विणकर सहकारी संस्था काढल्या. बालविवाहाची बंदी मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षे केले.विधवा विवाह विधवा विवाहाला प्रोत्साहन, स्वतःच्या दरबारात लग्न लावून दिले.
डॉ.बाबासाहेब आणि शाहू महाराज डॉ.बाबासाहेबांचे पहिले भाषण शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाले. शाहूंनी डॉ.बाबासाहेबांना 2500 रु देऊन लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठविले.
3. मूकनायक डॉ.बाबासाहेबांचे पहिले पेपर 'मूकनायक' सुरू करण्यासाठी शाहूंमहाराज यांनी आर्थिक मदत केली.डॉ.
बाबासाहेबांनी शाहूंराजाना "राजर्षी" ही उपाधी दिली. त्यांची जयंती ही दिवाळी सारखी साजरी करण्याचा आपणा सर्वांना संदेश दिला
त्यानंतर माननीय अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी कुमारी देवयानी मधाळे भगिनींनी शाहू महाराजांच्या उत्कृष्टपणे केलेल्या भाषणाबद्दल त्यांचे कौतुकही केले या भगिनी नेहमीच महापुरुषांची प्रथम पाहुण्याअगोदर भाषणे करतात हा त्यांचा आदर्श आहे.
त्यानंतर जगन्नाथ आठवले विहारांचे उपाध्यक्ष यांनी निवेदन केले की 29 तारखेला पौर्णिमेचा कार्यक्रम विहारात असलेले सर्वांनी सायंकाळी सात वाजता उपस्थित राहण्याबाबत विनंती केली . सर्व उपस्थित आणि पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले.धम्म पालन गाथा संपन्न होऊ कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास डॉ. सुधीर कोलप, जगन्नाथ आठवले चंद्रकांत चौधरी संजय घाडगे अवंतिका वाघमारे श्रीशैल चवडीकर, हनुमंत साबळे. इत्यादी उपस्थित होते



0 Comments