Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेतकऱ्यांच्या बँक खात्याला 'होल्ड' लावण्याचा पाटण बँकेचा अफलातून कारभार; शेतकऱ्यांमध्ये संताप*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*शेतकऱ्यांच्या बँक खात्याला 'होल्ड' लावण्याचा पाटण बँकेचा अफलातून कारभार; शेतकऱ्यांमध्ये संताप*

*हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी* 

जिवती:- जिवती तालुक्यातील पाटण येथील बँकेच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता 'होल्ड' लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून बियाणे, खते, औषधे तसेच शेतीच्या इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना तातडीने पैशांची आवश्यकता आहे. मात्र खात्यावर होल्ड असल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी बँकेच्या वारंवार फेऱ्या मारत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खात्यावर होल्ड लावण्यामागील कारण स्पष्टपणे सांगितले जात नाही. काहींना आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे, तर काहींना समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असून संबंधित बँक प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन पात्र खातेदारांच्या खात्यांवरील होल्ड हटवावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची संबंधित वरिष्ठ बँक अधिकारी आणि प्रशासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिवती तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
(टीप : या बातमीत मांडण्यात आलेले आरोप संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहेत. संबंधित बँकेची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Post a Comment

0 Comments