जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*अंगणवाडी भरते भाड्याच्या खोलीत कुंभेझरी (मराठगुडा) येथील इमारत मंजूर तात्काळ करण्याची मागणी.*
जिवती,17- जिवती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्राम पंचायत,कुंभेझरी अंतर्गत येत असलेल्या मराठगुडा येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक.4 येथे अंगणवाडी इमारत उपलब्ध नसल्याने ,येथील अंगणवाडी सेविका यांनी भाड्याची रूम किरायाने घेऊन तेथील मुलांना शिक्षणाचे धडे, व शैक्षणिक उपक्रम राबवून,खिचडी व इतर पोषण आहार देतात.ग्राम पंचायत स्तरावरून अनेकदा बालविकास प्रकल्प कार्यालय, तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना पत्र व्यवहार केले व मागणीचे प्रस्ताव सुद्धा पाठवले. परंतु प्रशासनाकडून कसलीच कारवाई झालेली नसल्याचे ग्राम पंचायत चे उपसरपंच श्री.लहुजी गोतावळे यांनी सांगितले. प्रशासकीय काळात अधिकारी हे त्यांचे हितचिंतक व जवळील नेत्यांच्या गावातील कामांना प्रथम प्राधान्य दिल्या गेले असे ठळक आरोप त्यांनी केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत अनेकदा निवेदने व प्रस्ताव देऊन संबंधित विभाग प्रमुखांकडून कुठलेही कारवाई केली नसल्याने सदर अंगणवाडी मंजूर केव्हा होईल? व ही मुले आपल्या हक्काच्या अंगणवाडी इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवतील का?याकडे आता गावातील सर्व मुलांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. यावर संबंधित अधिकारी प्रशासन काय भूमिका घेतील, व तात्काळ अंगणवाडी इमारत मंजूर करून मुलांना या पडक्या किरायाच्या बंद खोलीतून प्रशस्त इमारतीत मोकळा श्वास घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



0 Comments