Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

देवलागुडा गावातील दोन युवकांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड



जिल्हा प्रतिनिधी 
                       हाकानी शेख 

देवलागुडा गावातील दोन युवकांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

जिवती :- तालुक्यातील दुर्गम भागातील छोट्याशा देवलागुडा गावाने क्रीडा क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. गावातील गणेश जाधव यांचा मुलगा महादेव जाधव आणि मधुकर राठोड (शिल्पकार) यांचा मुलगा युवराज राठोड यांची मध्यप्रदेश येथे 28 आणि 29 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
           या दोन्ही युवा खेळाडूंनी आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने ही संधी मिळवली आहे. त्यांच्या या यशाने गावाला आणि जिवती तालुक्याला अभिमान वाटत आहे. स्थानिकांनी त्यांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.महादेव आणि युवराज यांना राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून गावाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व स्तरातून शुभकामना देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments