Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती तालुक्यातील तहसिल कार्यालयात अधिकारी ठेवतात पर्सनल आॅपरेटर

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

चंद्रपूर जिल्ह्यातील अती दुर्गम भाग म्हणुन ओळखत असलेला जिवती तालुका सदर तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कामचुकार असुन तहसिल कार्यालयातील अनेक अधिकारी आपले कार्यालयीन कामे हे बाहेरील व्यक्ती आपल्या खुर्चीवर बसवुन कार्यालयातील स्वतःचे कामे बाहेरील व्यक्ती कडुन करुन घेतात आणी यामुळे तहसिल कार्यालयात येणारे नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सरकारी अधिकाऱ्यांना शासनाने प्रशिक्षण देऊन पदांची जबाबदारी सोपवलेली असता शासकीय कामे बाहेरचे व्यक्ती कडुन करुन घेतल्या जाते
  कर्मचाऱ्यांना त्याच्या पदवी नुसार प्रमोशन दिले जाते तरी पण कर्मचारी खाजगी मुलांना ठेऊन कार्यालयीन सर्व कामे करत असतात आणि कामाच्या मोबदल्यात ग्राहका कडून पैशाची मागणी केली जाते सर्व लाभ धारकांना वाटतेय की कार्यालयात तील काम निःशुल्क असते म्हणून सर्व लाभार्थी शासकीय कार्लायात येतात पण येथे वेगवेगळ्या बाबी पैशा शिवाय केल्या जात नाही. सर्व खाजगी मुलं ठेऊन कार्यालयात आलेल्या ग्राहकांची कामे करत असतात. मग शासकीय कार्यालयात सरकारने नियुक्त केलेले कर्मचारी काय करतातं असा प्रश्न निर्माण होतो. या कडे वरीष्ठ अधिकारी लक्ष. देत नाहीत
या पुर्वी ऑपरेट ची तहसीलदार यांच्या कडे दिलेली असल्याचे सुत्राकडुन माहिती उपलब्ध झाली आहे तर तक्रार करून सुद्धा कोणत्याही तहसीलदार यांनी ऑपरेट वर कोणतीच कार्यवाही केली नाही. याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की तहसीलदार यांचा सुद्धा ऑपरेट ठेवले तरी काही हरकत दिसत नाही  अशी शंका जनतेच्या मनात येत आहे कार्यालयातील प्रकार तहसीलदार यांना माहित असून सुद्धा तहसिलदारांनी कोणते ही पाऊल उचललेले दिसत नाही

Post a Comment

0 Comments