महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
शासनाकडुन शेतकऱ्यांना व मजुरांना लाभ मिळावा म्हणुन नेहरु स्वावलंबन योजना मनरेगा योजनेतुन शेती सुधारण्यासाठी सिंचन विहीर तसेच अनेक योजना दिल्या जातात पऱतु सोरेकासा ग्राम पंचायतीत सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क बानावट कागदपत्रांची जुळवा जुळव करुन सिंचन विहीर मिळवीली असल्याचे मत सोरेकासा ग्राम पंचायत च्या उपसरपंचा निलाबाई दिलीप जाधव यांचे आहे व यांनी तहसिलदार जिवती यांच्याकडे सदर शेतकरी व जबाबदार असलेले अधिकारी व रोजगार सेवक यांच्या नावाने तक्रार केली असुन यात तिन शेतकऱ्यांचा समावेश असून सरपंच व ग्रामसेवक या सोबत रोजगार सेवकां विरुद्ध तक्रार केली आहे
सदर शेतकऱ्यांनी रोजगार सेवकांच्या मदतीने मजुरांची मजुरी ही आपल्याच कुटुंबातील सदस्यांची नावाने मिळवली असुन यांच्या शेताची बनावट पट्टे तयार केले असल्याचे मत उपसरपंचा निलाबाई जाधव यांचे आहे सातबारे राहपल्ली येथील असुन धाबा परीसरात कुठेही विहीरीचे बांधकाम झाले नाही अशी खंत निलाबाई जाधव यांनी व्यक्त केली आहे.



0 Comments