Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा**ग्रामवासीयांना घेऊन करणार उग्र आंदोलन उपसरपंच नर्सिंग हामणे*

*शेणगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा*
*ग्रामवासीयांना घेऊन करणार उग्र आंदोलन उपसरपंच नर्सिंग हामणे*

हकानी शेख प्रतिनिधी 

जिवती:-जिवती पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शेणगाव येथे खुलेआम अवैध दारू विक्री व तसेच इतर अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्री व जुगाराबद्दल जिवती पोलीस स्टेशनला दि.१४/०८/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव तसेच ग्रामवस्याकडून निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात अवैध दारू विक्री, जुगार बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अवैध दारू विक्री आताही सुरू असून या कडे पोलीस विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे गावात शांतता भंग होण्याची शक्यता दिसून येत आहे. तात्काळ अवैध दारू विक्री बंद करावी, अवैध दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अवैध दारू विक्री बंद करण्यात आली नाहीतर ग्रामवासियांना घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता पोलीस स्टेशन जिवती यांनी घ्यावी असा इशारा प्रसिद्धी पत्रातून नर्सिंग हामने उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments