*विकासाचा वादा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता दादा*
*लोकप्रतिनिधी मालामाल जिवती तालुक्यातील जनतेचे बेहाल*
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:-तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जिवती तालुक्यातील अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील जनतेचे समस्या शासन व प्रशासन दरबारी निडरता, निपक्षपणे मांडणारे तालुक्यातील जनतेला शेतकऱ्यांना दीनदुबळ्यांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी जिवती तालुक्यातील काही व्हाट्सअप ग्रुप वर आणि फेसबुक वर तालुक्यातील रस्त्याबद्दल आपली प्रखर भूमिका मांडली, गडचांदूर जिवती या मुख्य रस्त्याला जोडणारा सारंगापूर रस्ता या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून. या रस्त्यावर सिमेंट काँक्रीट पुल बांधलेला असून पुलवरचा सिमेंट काँक्रीट निघून गेल्यामुळे लोखंडी सळई खुले झाले असल्याने मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा आरोप करत संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे. विकासाच्या वादा रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता दादा लोकप्रतिनिधी मालामाल जिवती तालुक्यातील जनतेचे झाले. बेहाल हमारी मांगे पुरी करो वर्णा खुर्ची खाली करो. जागो बांधकाम विभाग जागो व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी माग सुदाम राठोड यांनी केली आहे.



0 Comments