*जिवती तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे. याकरिता तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*
हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी
जिवती:- गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला तसेच फळबागांची उभी पिके वाहून गेली असून नदी–नाल्यालगतची शेती खरवळून गेल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कापसाची बोंडे कुजली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.अशीच परिस्थिती राहील व सरकारकडून कुठलेही आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळेच त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता
सुदाम राठोड शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर करून, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.सुदाम राठोड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. अवकाळी पावसामुळे शेती करण्यायोग्य जमीनही उद्ध्वस्त झालेली असल्याने त्वरित मदत न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडतील.
या मागणीस पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments