Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

व्यसनमुक्ती जनजागृती महिला मेळावा उत्साहात संपन्नभद्रावती येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

व्यसनमुक्ती जनजागृती महिला मेळावा उत्साहात संपन्न

भद्रावती येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन

भद्रावती, दि. ७ ऑक्टोबर २०२६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सहकार्याने आणि झेप व झेप नई दिशा व्यसनमुक्ती केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान – नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सरस्वती समाज भवन, विजासन रोड, भद्रावती येथे हा मेळावा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशजी पालीवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मयुरा अवतडे, स्मिता बहिरमवार, विशाल गावंडे, रेखा खुटेमाटे, शोभा पारखी आणि सुवर्णा पिंपळकर उपस्थित होते.

यावेळी व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचारपद्धती तसेच व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच व्यसनमुक्तीविषयक पोस्टर्सचे प्रदर्शन आणि जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले.

कुटुंबीयांनी सांगितले व्यसनमुक्तीचे अनुभव

मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे झेप व झेप नई दिशा दारूमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रात उपचार घेऊन व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेले अनुभव. व्यसनमुक्तीच्या प्रवासातील संघर्ष, कुटुंबीयांची भूमिका, परस्पर सहकार्य आणि व्यसनमुक्तीनंतर पुन्हा सावरलेले कौटुंबिक जीवन याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले.

“व्यसनमुक्ती ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची गरज आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन माधुरी बदकी व कल्पना गोचे यांनी केले. सुनिता राजुरकर यांनी प्रास्ताविक, तर माया वासनिक यांनी आभार प्रदर्शन केले.

झेप व झेप नई दिशा दारूमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, बाबुपेठ, चंद्रपूर येथील कार्यकर्ते तसेच किशोरपथ व धन्वंतरी समूहातील सदस्यांच्या सहकार्याने हा जनजागृती मेळावा यशस्वी झाला.

“व्यसनमुक्त कुटुंब — सुदृढ समाज, विकसित भारताची ओळख!” या संदेशातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.

Post a Comment

0 Comments