चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
बंद पोलीस चौक्या सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
ममनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर शहरातील विविध परिसरात नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र अनेक वर्षांपासून काही पोलीस चौक्या बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, चोरी, भांडणे, अवैध प्रकार तसेच इतर अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे.
याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ठामपणे मांडत बंद असलेल्या पोलीस चौक्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी पोलीस अधीक्षक साहेबांनी मागणीची गांभीर्याने दखल घेत “मी स्वतः याबाबत चौकशी करून चंद्रपूर शहरातील बंद असलेल्या प्रत्येक पोलीस चौकीबाबत आवश्यक कार्यवाही करून त्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन दिले.
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या या सकारात्मक आश्वासनामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता प्रत्यक्ष कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनसेचा लढा कायम राहणार असून, बंद पोलीस चौक्या प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. या निवेंदन देत अस्ताना कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल दुर्गे राकेश मुनावत मनोज रावले उपस्तीत होते



0 Comments