Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

कुपवाडमध्ये आंबेडकरी स्मारकासाठी जागेचा शोध; १७ सप्टेंबरच्या महासभेकडे लक्षकुपवाडच्या भूमीत बाबासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी निर्णायक हालचाल!

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 



कुपवाडमध्ये आंबेडकरी स्मारकासाठी जागेचा शोध; १७ सप्टेंबरच्या महासभेकडे लक्ष

कुपवाडच्या भूमीत बाबासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी निर्णायक हालचाल!

दि. ०८ सप्टेंबर २०२६

कुपवाड : 

*कुपवाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारणीचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, यासाठी पर्यायी जागांची प्रत्यक्ष पाहणी "दहाड" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सचिनदादा सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांना घेऊन केली.*

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या बहुजन बांधवांच्या वतीने, "दहाड" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मा. सचिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड शहरातील विविध जागांची पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहिल्याने या विषयाला अधिकृत गांभीर्य प्राप्त झाले आहे.

या पाहणीदरम्यान प्रभाग समिती क्र. ३ कुपवाडच्या सहायक आयुक्त मा. श्वेता सुर्वे, अधीक्षक अनिस मुल्ला, नगररचना विभागाचे शाखा अभियंता रविंद्र भिंगारदिवे तसेच बांधकाम विभागाचे नगर अभियंता महेश मदने, शाखा अभियंता अशोक कुंभार यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून संभाव्य जागांचा आढावा घेतला.

प्रमुख स्थळांमध्ये प्रभाग समिती क्रमांक ३ कार्यालयासमोरील मोकळी जागा, सम्राट चौक परिसर, सम्राट अशोक चौकाजवळील प्रस्तावित भाजी मंडई परिसर, तसेच कुपवाड येथील लाड शाळेसमोरील भू.क्र. ४६/२ महानगरपालिका खुली जागा यांचा समावेश होता. या सर्व जागांचा बारकाईने अभ्यास करून योग्य स्थळ निश्चित करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे.

यावेळी नगरसेविका प्राजक्ताताई धोतरे, सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते लाडू धोतरे, आनंदराव कांबळे, संपत धोतरे यांच्यासह संजय धोतरे, जयसिंग धोतरे, ॲड. श्रीनाथ कांबळे, सनी धोतरे, मोहन साबळे, पंकज धोतरे, प्रशांत वाघमारे, मिलिंद सरोदे, संजय कांबळे, पवन वाघमारे, विनोद सौदे, क्रांती कांबळे, विवेक तोरवे, हिरामण भगत, निखिल गाडे, इंजि. सचिन कांबळे, विशाल कांबळे, गौतम भगत, प्रताप कांबळे, ओंकार कांबळे, विक्रांत गायकवाड आदींसह बहुजन समाजातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गुरुवार दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता "तक्षशिला बुद्धविहार" कुपवाड शहर येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या निर्णायक बैठकीत या सर्व पाहणी केलेल्या जागांवर सखोल चर्चा करून अंतिम जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महासभेत अधिकृत ठराव मांडून, कुपवाड शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य सांस्कृतिक भवन उभारणीसाठी अंतिम शिक्कामोर्तब करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कुपवाड शहरात उभारण्यात यावा हा बहुजन समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या या मागणीवर आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय होत असल्यामुळे बहुजन समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments