Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अद्याप नवे टायर नाहीत; जीवितास धोका टाळण्यासाठी तातडीची कारवाईची मागणी**१८ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनानंतरही आश्वासनाची पूर्तता नसल्याची खंत; टायर निकृष्ट अवस्थेत असल्याने अपघाताची भीती व्यक्त*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला अद्याप नवे टायर नाहीत; जीवितास धोका टाळण्यासाठी तातडीची कारवाईची मागणी*

*१८ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनानंतरही आश्वासनाची पूर्तता नसल्याची खंत; टायर निकृष्ट अवस्थेत असल्याने अपघाताची भीती व्यक्त*

जिवती:-
जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील रुग्णवाहिकेचे चारही टायर अत्यंत झिजलेल्या अवस्थेत असून, रेफर रुग्णांना पुढील उपचारासाठी नेताना टायर फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णवाहिकेला तातडीने चार नवीन टायर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

याबाबत दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी शेणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नरसिंग हामणे व सदस्य, सय्यद शब्बीर जागीरदार (सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ अध्यक्ष, पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र) तसेच गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कटारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्या निवेदनामध्ये रुग्णवाहिकेच्या जीर्ण झालेल्या टायरांचा मुद्दा स्पष्टपणे मांडण्यात आला होता.

निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एका आठवड्याच्या आत नवीन टायर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला नवीन टायर उपलब्ध झाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, रुग्णवाहिका ही आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने तिची तांत्रिक स्थिती सुरक्षित असणे आवश्यक आहे. जर झिजलेल्या टायरमुळे कोणतीही दुर्घटना घडून रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांच्या जीवितास हानी पोहोचली, तर त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर निश्चित करण्याची मागणीही निवेदनकर्त्यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर, रुग्णांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेस तात्काळ चार नवीन टायर उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच रुग्णवाहिकेची संपूर्ण तांत्रिक तपासणी करून ती सुरक्षित स्थितीत सेवेत ठेवावी, अशी मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments