सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
🔥 कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी लढा निर्णायक टप्प्यावर
सांगली : कुपवाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक दिशा देण्यासाठी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता पाचवी महत्त्वपूर्ण निर्णय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक सावंत प्लॉट, मराठा सेवा संघ भवनाजवळील ‘दहाड’ सामाजिक संघटना कार्यालय, सांगली येथे होणार आहे. बैठक ‘दहाड’ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन (दादा) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कुपवाड यांच्या वतीने आयोजित या बैठकीस फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुजन समाजातील बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा, रणनीती आणि पुढील कार्यवाहीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.



0 Comments