चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख
*अभिषेक माध्यमिक विद्यालय चिखली (खुर्द) येथे दहीहंडी उत्सव साजरा*
दिनांक- ०५ सप्टेंबर रोज शनिवारला अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली (खुर्द )येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.सोबतच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षक दिना निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम अंतरंगीत असल्याने तोडफोड मडकी फोड, आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी व तोडफोड मडकी फोड या स्पर्धेमध्ये १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ज्या स्पर्धकांमध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून प्राविण्य घेईल अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. प्रथम कु.मेघना रविकांत कांबळे, द्वितीय कु. पुनम केदासे, व तृतीय, अजय बोडगीर यांनी पटकावले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मलकार्जुन पा. सुरनर साहेब ,व उद्घाटक मा. नागोरावजी पा.बोडगीर , प्रमुख मार्गदर्शक गडचांदूर शहराचे नगराध्यक्ष मा. नितेश भाऊ ताजणे साहेब, मा सुरेश दादा केंद्रे साहेब, व प्रमुख अतिथी म्हणून मा.संतोष जी मोतेवाड ,मा खंडू पाटील सलगर मा.सरपंच चिखली (खुर्द),मा.बालाजी पाटील भुते ,मा. सुयोगजी डोंगरे साहेब, मा. कुणालजी पारखी. शिवराजी जवाले, फारुख शेख, हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.नितेश भाऊ ताजने साहेब नगर अध्यक्ष गडचांदुर यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन्सिल ,पेन व इतर शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आले व गोडधोड म्हणून सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वितरित करण्यात आले. आपल्या मार्गदर्शना मध्ये विद्यार्थी दशेत असणारे सर्व गुण आणि शिक्षक हा एक समाजाचा द्विगुणित अंग असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा अंगद गायकवाड सर( मु.अ.) यांनी केले व सूत्रसंचालन श्री शंकर गेडाम (सर), यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन,संकल्पना, व आभार श्री सुभाष राठोड (सर )यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.



0 Comments