Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

निरपेक्ष कीर्तन सेवेसाठी ह भ प नागनाथ महाराज तोगरे यांची जिवती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख 


*निरपेक्ष कीर्तन सेवेसाठी ह भ प नागनाथ महाराज तोगरे यांची जिवती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती* 

सुग्रीव गोतावळे- तालुका प्रतिनिधी 

जिवती,४- निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी ह.भ.प.नागनाथ महाराज तोगरे यांची जिवती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून कीर्तन, प्रवचन, अध्यात्मिक प्रबोधन, तसेच समाजामध्ये सदाचार, संस्कार आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे 
वारकरी संप्रदायाची संत परंपरा, कीर्तन प्रवचनाची समृद्ध परंपरा आणि समाजप्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने निरपेक्ष कीर्तन सेवा संस्था विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित आहे. या कार्याला जिवती तालुक्यात व्यापक स्वरूप देण्यासाठी हरिभक्त पारायण नागनाथ महाराज तोगरे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
किर्तन हे केवळ धार्मिक म्हणून देण्याचे माध्यम नसून समाजाला विवेक, संस्कार नैतिकता, आणि माणुसकीचे दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे संत विचार, अभंग, भारुड आणि कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, अंधश्रद्धा निर्मूलन, संस्कारक्षम समाज निर्मिती आणि युवा पिढीला सकारात्मक दिशा देण्यासाठी कार्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे या कार्यासाठी तालुक्यातील कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून विविध उपक्रम राबविण्याचे अपेक्षा व्यक्त होत आहे, या त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील अध्यात्मिक व सामाजिक कार्यालय नवी ऊर्जा मिळेल. असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निरपेक्षी कीर्तन सेवेचा विस्तार गावगावातून संत विचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचला अशी अपेक्षा आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे आगामी परमार्थिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यामुळे व त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील अनेक इष्ट मित्रमंडळी कडून सामाजिक राजकीय धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments