Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती तालुक्यात अवैध सुगंधित तंबाखू-गुटखा विक्रीला ऊत; संबंधित यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख 

*जिवती तालुक्यात अवैध सुगंधित तंबाखू-गुटखा विक्रीला ऊत; संबंधित यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक किरकोळ दुकाने, पानटपऱ्या व इतर व्यावसायिक आस्थापनांमधून अशा उत्पादनांची विक्री होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून, संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जिवती तालुका हा तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे विविध मार्गांनी सुगंधित तंबाखू व गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच काही प्रमाणात बल्लारपूरसह इतर भागांतूनही या प्रतिबंधित पदार्थांची खेप तालुक्यात पोहोचत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या बाबत संबंधित यंत्रणांनी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

राज्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ (Food Safety and Standards Act, 2006) तसेच अन्न सुरक्षा व मानके नियमांनुसार गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध लागू आहेत. 

अशा परिस्थितीत प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्यास त्याची गंभीर दखल घेणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी कोणतीही भीती न बाळगता प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुण पिढी व विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA), पोलीस विभाग, महसूल प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून वस्तुस्थितीची पडताळणी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच पुरवठा साखळीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments