Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

स्वर्गीय अर्जुनराव गोतावळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वृक्षारोपण व शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*स्वर्गीय अर्जुनराव गोतावळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वृक्षारोपण व शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*

जिवती -६-जिवती तालुक्यातील मोजा कुंभेजरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अर्जुनराव निवृत्ती गोतावळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्या जातात. दिनांक 5.8 2026 रोजी यावर्षी गावात 100 झाडांची वृक्ष लागवड करण्यात आले. व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त इतर बाबीवर खर्च न करता त्या पैशाचा योग्य वापर होऊन समाज हिताच्या दृष्टीने लोकोपयोगी, शैक्षणिक व सामाजिक, हितकारक उपक्रम राबविले जात असून गेल्या दहा वर्षापासून अशाच प्रकारचे उपक्रम राबवून एक आगळावेगळा पायंडा गोतावळे बंधूंनी सुरूच ठेवलेला आहे. येथे वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी जेष्ठ श्री नागनाथ महाराज तोगरे श्री दत्ताजी तोगरे प्रा. सुग्रीव गोतावळे,डॉ. अंकुश गोतावळे दीपक गोतावळे, लहुजी गोतावळे, सौ.अनिता गोतावळे सौ.जयश्री गोतावळे सौ.मंदा गोतावळे सौ.धनलक्ष्मी गोतावळे,भगवान कांबळे, रामू गोतावळे, पिंटू त्तत्तापुरे, संतोष गोतावळे, बाबू राठोड , बापूराव राठोड, मुकिंद राठोड धोंडू तात्या गोतावळे प्रभू बसवंते, रवी जेवाले, सिताराम भुरे,दत्ता गायकवाड, सुनील आरेवार, अंकुश कांबळे, नामदेव भालेराव व असंख्य महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments