Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

भाजप नगरसेवक सूरज पांडे यांची तीन महिन्यांसाठी तडीपारी**गडचांदूर नगरपरिषदेतील भाजप नगरसेवकाला चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*भाजप नगरसेवक सूरज पांडे यांची तीन महिन्यांसाठी तडीपारी*

*गडचांदूर नगरपरिषदेतील भाजप नगरसेवकाला चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश*

हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:- गडचांदूर नगरपरिषदेतील भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी 24 ऑगस्ट रोजी आदेश पारित करत पांडे यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सूरज पांडे यांच्यावर विविध स्वरूपाचे तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गडचांदूर शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसेवकावरच तडीपारीची कारवाई झाल्याने गडचांदूर शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments