चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जिवतीत वनविभागाची मोठी कारवाई; सागवाण तस्करी प्रकरणातील फरार तिन्ही आरोपी अवघ्या 24 तासाच्या आत वनविभागाच्या ताब्यात*
जिवती : सागवाण तस्करी प्रकरणात वनविभागाला मोठे यश मिळाले असून फरार तिन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीच पिकअप वाहनासह सुमारे ६.२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
वनविभागाच्या धडक कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



0 Comments