Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ सांगलीत बहुजन संघर्ष सेनेचे उपोषण आंदोलन*

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 



*NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ सांगलीत बहुजन संघर्ष सेनेचे उपोषण आंदोलन*

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा
सांगली, दि. 24 : NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून, NEET परीक्षेच्या प्रक्रियेवर उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांमुळे देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची हमी द्यावी आणि भविष्यातील परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करावी, अशा प्रमुख मागण्या बहुजन संघर्ष सेनेने केल्या आहेत.
तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक, युवक तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले आहे.
आंदोलन : शुक्रवार, 24 जुलै 2026 | दुपारी 3 वाजल्यापासून
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सांगली
आयोजक : बहुजन संघर्ष सेना, महाराष्ट्र राज्य
संपर्क : 9975027750 | 8329384385 | 9860393916

Post a Comment

0 Comments