Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, भारी पोलीस स्टेशनकडे एक नजर टाका!**‘हप्ता वसुलीसाठी खाजगी एजंट?’ गंभीर आरोपांची चर्चा; अवैध धंद्यांवर कारवाई कधी?*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, भारी पोलीस स्टेशनकडे एक नजर टाका!*

*‘हप्ता वसुलीसाठी खाजगी एजंट?’ गंभीर आरोपांची चर्चा; अवैध धंद्यांवर कारवाई कधी?*

*वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी*

"हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी"

जिवती:-जिवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असल्याने या परिसरातून विविध प्रकारच्या अवैध हालचाली सुरू असल्याच्या चर्चा वेळोवेळी समोर येत आहेत. मात्र, भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असल्याचे सांगितले जाणारे अवैध धंदे आणि त्यावर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारी पोलीस स्टेशन हद्दीतील चिलाटीगुडा परिसरात अवैध दारू विक्री तसेच गांजाच्या विक्रीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तेलंगणा राज्यातून अवैध दारू व गांजाच्या खेपा आणल्या जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे बोलले जात आहे. तसेच जिवती तालुका सीमावर्ती भाग असल्याने युरिया व इतर खतांची कथित तस्करी तसेच गोवंश तस्करी होत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे, अवैध धंदे करणाऱ्यांकडून कथितरीत्या ‘हप्ता’ वसुलीसाठी खाजगी व्यक्तींचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. काही अवैध धंदेवाल्यांना संबंधित खाजगी व्यक्तीच्या फोन-पे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून पैसे पाठविण्यास सांगितले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांची सत्यता अधिकृतपणे सिद्ध झालेली नसून, याबाबत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
जर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भारी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे, कथित हप्ता वसुली आणि खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
सीमावर्ती भागातील अवैध तस्करी, अवैध दारू व अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘अवैध धंदे सुरूच कसे राहतात? पोलिसांना याची माहिती नाही का? आणि माहिती असूनही कारवाई का होत नाही?’ असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीकडे एकदा विशेष लक्ष द्या आणि या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी जिवती तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.


( महाराष्ट्र संवाद न्युज वेब पोर्टल वर प्रकाशित केलेल्या प्रत्येक बातमी शी संपादक सहमत असतील असे काही ही नाही) 

Post a Comment

0 Comments