चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
*जिवती तालुक्यातील वय 60 ते 65 वर्षातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचे फिंगरप्रिंट, डोळ्यांची फिंगर येत नसल्याने पगारी बंद झाल्याबाबत तहसीलदारांना निवेदन*
जिवती -२०-जिवती तालुक्यातील वय वर्ष 60 ते 65 वर्षावरील वयोवृद्ध महिला व पुरुष यांचे आधार मशीनवर हाताचे थंब, फिंगरप्रिंट व डोळ्यांचे फिंगर मशीन मध्ये सिस्टमला मॅच होत नसल्याने पगारी गेल्या वर्षभरापासून बंद झाल्याबाबत शासनाने वयोवृद्ध महिला व पुरुष यांना संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत ज्या महिला पुरुषांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळते. त्या वय वर्षे 60 ते 65 वर्षे महिला व पुरुषांचे आधार अपडेट करण्यासाठी गेले असता आधार केंद्रात त्यांच्या हाताची फिंगर घेत नाहीत. तसेच डोळ्यांची घेत नाही. त्यामुळे या महिलांचे पैसे त्यांच्या खात्याला जमा असून ती बँकेत होल्ड दाखवत आहेत. तेव्हा त्यांचे हयात प्रमाणपत्र निघत नसल्याने त्यांना सानुग्रह अनुदान मिळणे कठीण झालेले आहे. अशा महिला दररोज तहसील कार्यालयात हातात कागद घेऊन फिरत असतात एक तर त्यांच्यासोबत कोणी राहत नाहीत व सर्व स्त्री-पुरुष जवळपास निरक्षर असल्याने त्यांना समजत नाहीत. त्यामुळे अनेक चकरा मारून हे वयोवृद्ध महिला व पुरुष हरास्मेंट झालेले असल्यामुळे अनेक वयोवृद्धांचे जगणे याच पेन्शनवर आहे. काहींचे मुलं हे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबई पुणे. हैदराबाद, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये राहतात त्यामुळे त्यांचा दवाखान्याचा खर्च व जगण्यासाठी चा आधार हेच मिळणाऱ्या पेन्शनवर ते भागवतात. परंतु गेल्या वर्षभरापासून अशा अनेक महिला पुरुषांचे फिंगरप्रिंट होत नसल्याने त्यांचे हयात प्रमाणपत्र निघत नसल्याने त्यांच्या पगारी बंद झाल्यामुळे एकीकडे शासन स्तरावरून योजना राबवीत असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे शासनाकडून ऑनलाइन सिस्टमच्या कागदोपत्री मानसिक त्रास सामान्य लोकांना होत असल्याने या योजनांचा फायदा होण्याऐवजी लोकांचे नुकसानच होत असल्याचे यावरून वयोवृद्ध महिला व पुरुष आपल्या व्यथा सांगत आहेत त्यामुळे जिवती पंचायत समितीचे माजी सभापती श्री सुग्रीव गोतावळे, तिरुपती पोले, मारुती मोरे महादेव शेंबडे, प्रदीप काळे अजगर शेख यांनी यासंदर्भात तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन यावर तोडगा काढावा अन्यथा संपूर्ण तालुक्यातील वयोवृद्ध महिला पुरुष घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल यासंदर्भातले निवेदन मा. नायब तहसीलदार हेमंत तेलंग यांना दिलेले आहे तेव्हा वरिष्ठ यावर काय गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन मार्ग काढतील काय? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.



0 Comments