Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

पंचायत समिती जिवतीकडून माहिती देण्यास टाळाटाळ असल्याचा आरोप*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*माहिती अधिकाराच्या आदेशालाही केराची टोपली?* 

*पंचायत समिती जिवतीकडून माहिती देण्यास टाळाटाळ असल्याचा आरोप*

*हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी* 

जिवती:- पंचायत समिती जिवती अंतर्गत सोरेकासा ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये विविध शासकीय योजनांमधून मंजूर झालेल्या विहिरींच्या कामांची माहिती मागण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करण्यात आला होता. या अर्जात किती विहिरी मंजूर झाल्या, किती पूर्ण झाल्या, किती अपूर्ण आहेत तसेच सर्व कामांची जिओ-टॅगिंग छायाचित्रांसह माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, निर्धारित कालावधीत माहिती न मिळाल्याने अर्जदार हकानी शेख, पत्रकार तथा मनसे जिवती तालुकाध्यक्ष यांनी प्रथम अपील दाखल केले. दि. १९ जून २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत अपिलीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली माहिती अपूर्ण असल्याचे नमूद करत संबंधित माहिती अधिकाऱ्यांना आठ दिवसांच्या आत संपूर्ण माहिती अपीलकर्त्याला देण्याचे आदेश दिले.
तथापि, आदेशानंतरही वारंवार कार्यालयाच्या चकरा मारूनही आजपर्यंत संपूर्ण माहिती मिळालेली नसल्याचा आरोप अपीलकर्त्याने केला आहे. त्यामुळे संबंधित माहिती अधिकारी, पंचायत समिती जिवती यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे हकानी शेख यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात संबंधित विभाग काय भूमिका घेतो आणि अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी कधी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments