Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिल्हा परिषद शाळा कुंभेझरी येथे शिक्षकाची कमतरता**शाळा व्यवस्थापन समिती तसे गावातील नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


*जिल्हा परिषद शाळा कुंभेझरी येथे शिक्षकाची कमतरता*
*शाळा व्यवस्थापन समिती तसे गावातील नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा*

*हकानी शेख चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*

जिवती:- तालुक्यातील पीएमसी शाळा म्हणून ओळख असलेली एकमेव शाळा कुंभेझरी येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे सध्या कार्यरत असलेल्या दोन शिक्षकावर पूर्ण शाळेचा भार असल्यामुळे कुंभेझरी येथील 185 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या या शाळेमध्ये दोनच शिक्षक असल्यामुळे शिक्षण विभागाच्या या ठिसाळ नियोजनामुळे पालकांमध्ये व गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे या शाळेमध्ये विद्यार्थी संख्येनुसार किमान सात ते आठ शिक्षकांच्या आवश्यकता आहे मात्र या शाळेमध्ये सध्या नियुक्तीवर पाच शिक्षकांपैकी श्री गणेश जेणेकर सर प्रभारी मुख्याध्यापक कुंभेझरी येथे आहेत ते BLO म्हणून देवलागुडा येथे काम पाहत आहेत श्री मनोज अलोणे सर वि शि भाषा BLO कुंभेझरी काम करत आहेत व कु शीतल धारणे मॅडम शि से BLO कुंभेझरी काम करत आहे कु वैशाली सानप शि से कुंभेझरी व कु भारती मांटे शि से कुंभेझरी मेडिकल leave वर आहे 2 शिक्षक रजेवर आहेत आणि दोन शिक्षक बीएलओ म्हणून काम पाहत आहेत त्यांच्यामागे निवडणूक विभागाने एस आय आर ची जबाबदारी दिलेली आहे ते पूर्ण करण्यासाठी ते निवडणूक विभागाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत आणि शाळेमध्ये कार्यरत फक्त दोनच शिक्षक आहेत त्यामुळे त्या दोन शिक्षकावर शिक्षणाचा भार पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून या दोन शिक्षकांना शिक्षण देणे अवघड होत आहे ही शाळा तालुक्यामध्ये जिल्हास्तरावर उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते तेथील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमीची यश मिळवले आहे परंतु आता शिक्षक अभावी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे जिवती तालुक्यातील शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती ची व बदली प्रक्रियेवरही पालकांनी प्रश्न उपस्थित केले असून काही शिक्षकांचा पगार जिवतीच्या आस्थापनातून होतो व ते इतरत्र कार्यरत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास केलेला आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन कुंभेझरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सात दिवसांमध्ये शाळेला कुलूप बंद आंदोलन करण्यात येईल व शाळेतील सर्व मुलं जिवती पंचायत समिती येथे आणून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्ता वेंकट कांबळे उपाध्यक्ष श्री गजानन गंगाधर चव्हाण श्री विजय लक्ष्मणराव गोतावळे श्री बाळू कोंडीबा ठोंबरे श्री जयंत बळवंत गोतावळे श्री प्रकाश गणू राठोड सौ सोनू ताई धनाजी घोडके सौ आशाताई नामदेव भालेराव सौ संगीता ताई ठोंबरे श्रीमती सविताताई घंटेवाड सौ रेखाताई पवार सौ ज्योतिका पवार व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments