Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

राज्य स्तरीय परीजात स्वयंसेवी संस्था मुंबई कडुन जिवती तालुक्यातील पाटण केंद्रातील जि.प.प्राथ.शाळा बेलगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 



राज्य स्तरीय परीजात स्वयंसेवी संस्था मुंबई कडुन जिवती तालुक्यातील पाटण केंद्रातील जि.प.प्राथ.शाळा 
बेलगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

*आज दिनांक 18 जुलै 2026 रोज शनिवार ला जि.प. प्राथ. शाळा बेलगांव केंद्र पाटण पं.स. जिवती जि. चंद्रपूर येथे शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना राज्य पातळीवरील मुंबई च्या पारिजात स्वयंसेवी संस्था ही गरीब होतकरू, आदिवासी भागातील गरजू मुलासाठी काम करते अश्या या संस्थेकडून आज आमच्या बेलगांव शाळेत प्रत्येक विध्यार्थ्यांना एक स्कूल बॅग,आठ नोटबुक, एक कंपास पेटी,एक चित्रकला वही, असे एकूण तेरा शालेय साहित्य वाटप करण्यात आले.*
*या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून पाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा.श्री.संजय सेलोकर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोनेरावजी आत्राम तसेच सदस्य आणि गावातील पालक यांच्या उपस्थिती मध्ये साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी मनोगत मध्ये पारिजात संस्था मुबंई च्या कार्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील सगळ्यांना पर्यावरण तसेच शैक्षणिक बाबत जण जागृती करून"झाडे लावा झाडे वाचावा " या बाबत सांगण्यात आले.*
  *या कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मु. अ. कु. अंजली राठोड मॅडम व श्री पवार सर हे होते.* 
  *वरील सर्व शालेय साहित्य मिळण्यासाठी पारिजात संस्था मुंबई च्या सगळ्या सदस्याचे सहकार्य लाभले तसेच यवतमाळ जिल्ह्यामधील भारी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका कु.अनिता वऱ्हाडे मॅडम याचे मार्गदर्शन आणि जिवती पंचायत समिती मधील जि प उच्च प्रा शाळा हिमायतनगर चे मुख्याध्यापक श्री मनोज चव्हाण सर यांचे सहकार्य मिळाले*
  *शाळेच्या वतीने सगळ्या पाहुण्यांचे आणि पारिजात मुंबई चे आभार व्यक्त करण्यात आले 🙏🙏🙏🙏🙏🙏💐*

Post a Comment

0 Comments